होमपेज › Ahamadnagar › टवाळखोरांना चपराक देणारा निकाल

कोपर्डी : टवाळखोरांना चपराक देणारा निकाल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

लोणीमावळा येथील सामूहिक अत्याचारातील तीनही आरोपींना फाशीची शिक्षा झाली, आता कोपर्डीत कट रचून बलात्कार, खून केल्याप्रकरणी तिघांनाही फाशी झाली. या दोन्ही घटनांत शाळकरी मुलींशी संबंधित होत्या. त्यामुळे हे निकाल शाळकरी मुलींची छेडछाड करणार्‍या टवाळखोरांसाठी मोठी चपराक ठरले आहेत. 

शहरातील भागाचा वेगाचा विकास होत असताना, आजही खेड्यांतील अनेक गावांत प्राथमिक शाळांच्या पलिकडे शिक्षणाची व्यवस्था नाही. त्यामुळे मुलींना दुसर्‍या गावांत माध्यमिक शिक्षणासाठी जावे लागले. कोणी पायी, कोणी सायकल, कोणी एसटी बसने जाते. गावापासून दूरवर शाळेत मुली ज्यावेळी येतात, त्यावेळी अनेक टवाळखोर त्याचा फायदा घेतात. कोवळ्या वयातील मुलींची छेडछाड सुरू होते. घरात सांगितले, तर घरचे शाळा बंद करतील म्हणून शाळकरी मुली हा त्रास सहन करतात.

आपण त्रास देऊनही मुलगी विरोध करीत नसल्याचे लक्षात येताच यातील काही टवाळखोरांचे नराधम होतात. त्यातून लोणीमावळा व कोपर्डीसारखी घटना होते. शाळेतून घरी जातानाच या मुली छेडछाडी व एकट्या असताना पाशवी अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. त्यानंतर जिवालाही मुकल्या. या घटनानंतरचा जनआक्रोश लक्षात घेऊन सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली. त्यानंतर पोलिसांनीही अतिशय गांभीर्याने तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले अन् या गुन्ह्यांतील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. कोपर्डीच्या खटल्यात एकाने आरोपीने अत्याचार व खून केला होता.

इतर दोन आरोपींनी प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी नसले, तरी त्यांनी कट रचून मुख्य आरोपीस प्रोत्साहन दिल्याने फाशीची शिक्षा ठोठावली. यासाठी सरकारी वकिलांनी संसद हल्ला (अफलगुरु, नवज्योत) व इंदिरा गांधी हल्ल्याचा संदर्भ घेतला होता. शाळकरी मुलीवरील अत्याचार व खुनाच्या घटना फक्त लोणीमावळा व कोपर्डीपुरती मर्यादीत नाही, तरील विधितत्वशास्त्रज्ञ सालमन यांच्या तत्वानुसार समाजावर परिणाम करणार्‍या असल्याने न्यायालयाने खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. या कठोर शिक्षेमुळे ग्रामीण भागातील मुलींना त्रास देणार्‍यांना चपराक बसणार आहे.