Sat, Feb 23, 2019 22:52होमपेज › Ahamadnagar › एनआयसीएलचा गुंतवणूकदारांना 35 कोटींचा गंडा

एनआयसीएलचा गुंतवणूकदारांना 35 कोटींचा गंडा

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 30 2018 12:49AMविसापूर  :वार्ताहर

नगर शहारामधील मार्केट यार्ड भागात कार्यालय असलेल्या व भोपाळ (मध्यप्रदेश )मध्ये मुख्य कार्यालय असलेल्या एन.आय.सी.एल. कंपनीने जिल्ह्यातील वीस हजार गुंतवणूकदारांचे 35 कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी अडकल्या आहेत. ही रक्कम मिळण्यासाठी कंपनीच्या एजंटांनी गुंतवणूकदारांचे पैसे मिळवून देण्यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना भेटून साकडे घातले.   (निर्मल इन्फ्राहोम कंपनीज् लिमिटेड) एन.आय.सी.एल. मध्ये गुंतलेले पैसे मिळण्यासाठी लवकरात लवकर ठोस पाऊले उचलावीत, अशी मागणी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी भगीरथ कटके, योगेश कदम, संजय घोरपडे, लतीफ शेख, हनुमंत पवार, विकास यलवडे, गोरख खाडे  आदींनी पालकमंत्री प्रा. शिंदे यांची कर्जत येथे भेट घेऊन केले.

या कंपनीत भरलेले पैसे बुडतील की काय या भीतीपोटी पैसे भरलेल्या लोकांनी कंपनीच्या नगरमधील कार्यालय  तसेच एजंटांकडे तगादा लावला आहे. त्यामुळं एजंट कोणाचेही फोन उचलत नाही. लोकांच्या तगादा वैतागले आहेत. एजटांनी सर्व रक्कम कंपनीकडे जमा केलेली आहे.  प्रा. शिंदे यांनी या कंपनीबाबत  मंत्रालयात आवाज उठवून गुंतवणूकदरांचे पैसे पुन्हा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.