Tue, Nov 20, 2018 11:44



होमपेज › Ahamadnagar › स्वच्छता जागृतीसाठी महापौर थेट रस्त्यावर

स्वच्छता जागृतीसाठी महापौर थेट रस्त्यावर

Published On: Feb 14 2018 2:49AM | Last Updated: Feb 14 2018 12:04AM



नगर : प्रतिनिधी

26 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारच्या पथकामार्फत शहरात होत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीसाठी व नागरिकांनी स्वच्छतेचे मोबाईल अ‍ॅप डाउनलोडिंग करण्यासाठी महापौर सुरेखा कदम स्वत: रस्त्यावर उतरल्या आहेत. मंगळवारी सकाळी महापौर कदम, विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी वाडिया पार्कमध्ये ‘मॉर्निंग वॉक’साठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक, महिला व खेळाडू, युवक-युवतींना सर्वेक्षणाची माहिती देवून अ‍ॅप डाउनलोड करण्याचे आवाहन केले.स्वच्छ सर्वेक्षणाबाबत नागरिकांनी दक्ष रहावे. अ‍ॅप डाउनलोड करून कचर्‍याबाबत आपल्या परिसरातील समस्या, तक्रारीची माहिती अ‍ॅपवर टाकावी. 24 तासांच्या आत त्यावर उपाययोजना होतील.

सर्वेक्षणात चुकीची माहिती देवू नये. नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादावर मनपाला 1500 पैकी गुण मिळणार आहे. सर्वेक्षणाच्या आधारावरच भविष्यात उपाययोजनांसाठी मनपाला निधी मिळणार आहे, असे महापौर कदम यांनी सांगितले. वाडिया पार्क मैदान, बॅडमिंटन हॉल, स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी आदींशीही महापौरांनी संवाद साधला. यावेळी काही नागरिकांनी उपाययोजनांबाबत पर्याय सुचवून आपापल्या परिसरातील कचर्‍याच्या समस्या, घंटागाडी येत नसल्याच्या तक्रारीही केल्या. विरोधी पक्षनेते बोराटे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, स्वच्छता दूत शारदा होशिंग, केअर टेकर नरेश छजलानी, स्वच्छता निरीक्षक टी. एन. भांगरे यांनीही नागरीकांशी संवाद साधून स्वच्छ सर्वेक्षण व अ‍ॅप डाउनलोडिंगची माहिती दिली.