Thu, Jul 18, 2019 16:31होमपेज › Ahamadnagar › तरुणच देशाचे चित्र बदलतील : अण्णा

तरुणच देशाचे चित्र बदलतील : अण्णा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

आजचा तरुण हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे. हा तरुणच देशाचे चित्र बदलू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल (दि. 26) केले. पारधी समाज व पोलिस पाल्यांच्या नाशिक परिक्षेत्रीय रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या मेळाव्यात पारधी समाज व पोलिस पाल्यांच्या 1 हजार 120 जणांची विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांत निवड करण्यात आली आहे. त्यातील 80 उमेदवारांना सायंकाळी पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. न्यू आर्टस् महाविद्यालयात पारधी व पोलिस पाल्यांना रोजगार मिळावा, यासाठी परिक्षेत्रीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यातील एकूण 52 बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. सकाळी समाजसेवक हजारे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. कार्य क्रमाच्या सुरुवातीला मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

यावेळी पोलिस अधीक्षक शर्मा यांच्यासह सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, मनीष कलाविया, प्रा. किसन चव्हाण, किरण रहाणे आदी उपस्थित होते. हजारे म्हणाले की, या रोजगार मेळाव्यातून तरुणांना रोजगार मिळणार आहे. रोजगारानंतर त्यांनी स्वतःच्या कुटुंबासह इतरांचा विचार करून समाजाची सेवा केली पाहिजे. मेळाव्यात नगरसह नाशिक परिक्षेत्रातून हजारो युवक-युवती सहभागी झाले होते. त्यातील 1 हजार 120 जणांची निवड झाली असून, दुसर्‍या निवड फेरीसाठी 1 हजार 440 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. सूत्रसंचालन काळापहाड यांनी केले, तर सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले.