Sun, May 19, 2019 21:59होमपेज › Ahamadnagar › टोमॅटोच्या भावात घसरण; कांदा स्थिर

टोमॅटोच्या भावात घसरण; कांदा स्थिर

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 9:11PM

बुकमार्क करा

नगर : ज्ञानेश्‍वर शिंदे

पाच ते सहा महिन्यापासून वाढलेले टोमॅटोचे बाजारभाव मागील आठवड्यापासून कमी झाले आहेत. सत्तरी पार केलेला टोमॅटो 25 ते 20 रुपये किलोपर्यंत घसरला. टोमॅटोची आवक वाढली असून मागणी कमी असल्याने दर घसरले आहेत. टोमॅटोबरोबरच वांगी, फ्लॉवरसह पालेभाज्यांच्या भावातही  घसरण झाली. काकडीची आवक वाढल्याने बाभारभावात मोठी घसरण जाणवली. नवीन लाल कांद्याची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहेत. 55 रुपयांपर्यंत गेलेल्या गावरान कांद्याची आवक जवळपास संपली असून लाल कांदा 35 रुपयांवर स्थिरावला. कांद्याला उत्तर भारतात मागणी असल्याने बाजारभाव स्थिर आहेत. गावरान लसून आवक मध्यम असून बाजारभाव अवघे 30 रुपये किलो आहेत. पालेभाज्यांची आवक दररोज कमी जास्त होत असल्याने बाजारभावही त्या प्रमाणात कमी जास्त होत आहेत. 

बाजारभाव (क्विंटलमध्ये)-टोमॅटो- 500 ते 2000 रुपये, वांगी-200 ते 1200 रुपये, फ्लॉवर-200 ते 1000 रुपये, कोबी-200 ते 1600 रुपये, काकडी-200 ते 800, गवार-2500 ते 6000 रुपये, घोसाळे-1000 ते 2200 रुपये, दोडका-500 ते 3500 रुपये, कारले-1000 ते 3000, भेंडी-500 ते 3000 रुपये, वाल-1000 ते 4500 रुपये, घेवडा 2000 ते 4000 रुपये, डिंगरी-3000 ते 3000 रुपये, बटाटे-400 ते 600 रुपये, लसूण-1000 ते 3000 रुपये, हिरवी मिरची-1000 ते 2500 रुपये, लिंबू 200 ते 800 रुपये, आद्रक-1600 रुपये, गाजर-300 ते 1900 रुपये, दुधी भोपळा-300 ते 700 रुपये, वाटाणा-2000 ते 4000 रुपये, मका कणीस-300 ते 500 रुपये, शिमला मिरची-1000 ते 2500 रुपये, मेथी-(शेकडा) 400 ते 1200 रुपये, कोथिंबीर-400 ते 1200 रुपये, पालक 400 ते 1200 रुपये, शेपू-1200 ते 2000 रुपये, कांदापात-300 ते 600 रुपये, हरभरा जुडी-1200 ते 2000 रुपये. मागील पंधरवाड्याच्या तुलनेत गेल्या सहा-सात दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात थोडी वाढ झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार बाजारात ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन  व मक्याची आवक सर्वसाधारण आहे. ज्वारी 1600 ते 2305 रुपये, बाजरी 1050 ते 1100 रुपये, हरभरा 3800 रुपये, मूग 4000 ते 5700 रुपये, उडीद 2700 ते 4000 रुपये, गहू 1631 रुपये, सोयाबीन 2400 ते 2765 रुपये, मका 1131ते 1165 रुपये.