Sun, Jul 21, 2019 09:54होमपेज › Ahamadnagar › घरफोड्या करणारी सातजणांची टोळी जेरबंद

घरफोड्या करणारी सातजणांची टोळी जेरबंद

Published On: Dec 08 2017 1:35AM | Last Updated: Dec 07 2017 11:19PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

शहर व उपनगरामध्ये घरफोड्या करणार्‍या सात जणांची टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने काल पकडली. या टोळीकडून दोन मोटारसायकलींसह घरफोडी करण्याचे साहित्य असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. 

सावेडीतील भिस्तबाग महालाजवळील काही तरुण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने बुधवारी (दि.6) सायंकाळी एकत्र आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या परिसरास घेराव घातला. पोलिस आल्याचे पाहून हे तरुण पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. आरोपी सागर गोरख मांजरे (रा.मातापूर चौक), शंकर संजय गायकवाड (रा. उक्कलगाव), योगेश  सावळेराम मांजरे (रा. मातापूर चौक), अनिल गायकवाड (मातापूर चौक), सतीश गोरख गायकवाड (रा.उक्कलगाव), करण रामदास गायकवाड (रा.पानेगाव), नाना बाळू गुंजाळ (रा.उक्कलगाव, ता.श्रीरामपूर) यांना पकडण्यात यश आले. त्यांच्याकडून दोन मोटारसायकली, घर फोडण्यासाठी वापरली जाणारी लोखंडी कटावणी, सुरा, खिडकीचे गज, पक्कड, मिरचीची पूड आणि पाच मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

 त्यांच्याकडे चौकशी केली असता, दोन्ही मोटारसायकली चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले. सागर मांजरे व शंकर गायकवाड या दोघांनी या मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. सावेडीतील लॉर्ड बिशप कॉलनीत घरफोडी केल्याची कबुली दिली. शहर व उपनगरात घरफोड्या या टोळीने केल्याची शक्यता आहे. 

सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, शरद गोर्डे, योगेश गोसावी, दत्तात्रय हिंगडे, उमेश खेडकर, रावसाहेब हुसळे, संदिप घोडके, भागीनाथ पंचमुख, शंकर चौधरी, दिलीप शिंदे, योगेश सातपुते, संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.