Tue, Mar 19, 2019 15:39होमपेज › Ahamadnagar › पथदिवे घोटाळा प्रकरण; अभियंता सातपुते पोलिसांत हजर!

पथदिवे घोटाळा प्रकरण; अभियंता सातपुते पोलिसांत हजर!

Published On: May 21 2018 12:41PM | Last Updated: May 21 2018 12:41PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेच्या बहुचर्चित पथदिवे घोटाळा प्रकरणाचा मुख्य सूत्रधार निलंबित अभियंता रोहिदास सातपुते अखेर पोलिसांना शरण आला आहे. ३४ लाख रुपयांच्या या घोटाळ्याप्रकरणी सातपुते साडेतीन महिन्यांपासून पसार होता. त्याच्या विरोधात स्टॅंडिंग वॉरंटही जारी करण्यात आले होते. त्यामुळे आज तो पोलिसांना शरण येण्याची शक्यता होती.

पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दोन दिवसांत हजर न झाल्यास संपत्तीवर टाच आणण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आज सकाळीच सातपुते पोलिसांना शरण आला आहे. दुपारी त्याला न्यायालयात हजर करणार असल्याचे सपकाळे यांनी सांगितले.