Sat, Nov 17, 2018 03:40होमपेज › Ahamadnagar › पथदिवे घोटाळ्याची चौकशी सुरू

पथदिवे घोटाळ्याची चौकशी सुरू

Published On: Jan 02 2018 12:53AM | Last Updated: Jan 01 2018 11:50PM

बुकमार्क करा
नगर ः प्रतिनिधी

पथदिव्यांच्या कामांतील 40 लाखांच्या घोटाळ्याची चौकशी अखेर सुरु झाली आहे. आयुक्त घनश्याम मंगळे यांनी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे व नगररचनाचे सहाय्यक संचालक संतोष धोंगडे यांनी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर धोंडगे यांनी काल (दि.1) स्टेशन रोडवरील सुरु असलेल्या कामांची पाहणी पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत केली. महापौर सुरेखा कदम यांनी याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याचे पत्र आयुक्तांना दिले होते. आयुक्तांनी वालगुडे व धोंडगे यांना चौकशी करुन 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार धोंगडे यांनी दुपारी स्टेशन रोडवरील सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. बिले अदा झालेल्या कामांच्या ठिकाणी कामे सुरु असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले. यावेळी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव, दिलीप सातपुते आदी उपस्थित होते. दरम्यान, पाहणीनंतर धोंगडे यांनी आयुक्तांशी चर्चा केली असून आयुक्तांनी विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांना कामांच्या फायली सादर करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.