Fri, Nov 16, 2018 23:37होमपेज › Ahamadnagar › एलसीबी कडून बेकायदा दारू जप्त

एलसीबी कडून बेकायदा दारू जप्त

Published On: Jan 07 2018 2:00AM | Last Updated: Jan 06 2018 11:49PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखेने श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील हॉटेल अन्नपूर्णावर छापा टाकून 18 हजार रुपयांचा बेकायदा दारूसाठा जप्त केला. यापूर्वी तीन वेळेस छापे पडूनही येथे खुलेआम दारू विक्री सुरू होती. हॉटेल चालक भास्कर नाना डाके (रा. डाकेवस्ती, बेलवंडी बद्रूक, ता. श्रीगोंदा) यास अटक करण्यात आली आहे. हॉटेल अन्नपूर्णा येथे बेकायदा दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे, कर्मचारी फकीर शेख, दिगंबर कारखेले,

मल्लिकार्जुन बनकर, नामदेव जाधव, बबन बेरड आदींच्या पथकाने शुक्रवारी रात्री हॉटेल अन्नपूर्णा व हॉटेल पाठीमागे काही फूट अंतरावरील एका टपरीतून 18 हजार 90 रुपयांचा देशी-विदेशी दारुचा साठा हस्तगत केला. या हॉटेलवर यापूर्वी तीन वेळेस छापे पडूनही चौथ्यांदा मोठा दारुसाठा सापडला. पोलिसांनी हॉटेल चालक भास्कर डाके यास ताब्यात घेऊन बेलवंडी पोलिस ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटकेची कार्यवाही करण्यात आली. पुढील तपास बेलवंडी पोलिस करीत आहेत.