Mon, Jun 17, 2019 18:35होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यातील गावठी कट्टे पोलिसांच्या रडारवर

जिल्ह्यातील गावठी कट्टे पोलिसांच्या रडारवर

Published On: Apr 30 2018 3:39PM | Last Updated: Apr 30 2018 3:39PMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील गावठी कट्टे पोलिसांच्या रडारवर आहेत. शस्त्रे पकडण्याबाबत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, असे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. केसरकर हे आज (सोमवार दि.३०) सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात  आले होते. जामखेड दुहेरी हत्याकांडाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केसरकर म्हणाले की, जामखेडमध्ये घडलेले दुहेरी हत्याकांड दुर्दैवी आहे. पोलिसांनी चौकशीसाठी काही जणांना ताब्यात घेतले आहे. 

मारेकरी, सुत्रधार आणि साथीदारांवर कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी काही नावं निष्पन्न झाली आहेत. प्रथम दर्शनी हे हत्याकांड दुकानासमोर पाणी मारण्यावरुन झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणी अजून राजकीय कनेक्शन पुढं आलं नाही. तपासात सर्व काही निष्पन्न होईल. 

तर जिल्ह्यातील बेकायदेशीर हत्यारं आणि गावठी कट्टे समूळ नष्ट करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केलाय. या संदर्भात नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे आणि पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याशी आज चर्चा झाली. या बाबतची अंमलबजावणी लवकरच दिसेल. तर गावठी कट्ट्याचं खापर त्यांनी शेजारच्या राज्यांवर फोडलंय.

जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करी, हॉटेल व्यावसायिक, लॅडमाफिया यांना सोडणार नाही, लोकांना दिलासा देणं. त्याचबरोबर जिल्ह्यात पोलीस संख्या कमी असल्याचं त्यांनी मान्य केलंय. शेजारच्या जिल्ह्यातील नाशिक औरंगाबादच्या तुलनेत पोलीस कमी आहेत. माञ अढावा बैठकीत पोलीस संख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे.

तर स्वतंत्र गृहमंत्री पदावर बोलताना मुख्यमंत्री काम करत आहे. ते राज्याचा कारभार हाकत आहे. अनेक सकारात्मक गोष्टी केल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडलेली स्वतंत्र गृहमंत्र्यांच्या भुमीकेवर मी बोलणं उचीत होणार नाही, असेही ते म्हणाले.