Wed, Jan 16, 2019 05:24होमपेज › Ahamadnagar › राहुरीत अंधश्रध्देतुन मुलीचा बळी 

राहुरीत अंधश्रध्देतुन मुलीचा बळी 

Published On: Feb 05 2018 5:49PM | Last Updated: Feb 05 2018 5:49PMराहुरी : प्रतिनिधी 

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया शिवारात मुंडके, हात व पाय नसलेला मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आठवड्याभरापासून गायब असलेल्‍या मुलीचा मृतदेह चंद्रग्रहणानंतर सापडल्याने मुलीचा अंधश्रद्धेतून बळी घेतला असल्‍याचे बोलले जात आहे. 

मनिषा रोहिदास वाघ (वय13वर्ष) रा. मुसळवाडी तलावाजवळ, टाकळीमिया ता. राहुरी ही मुलगी आपल्या राहत्या घरातून आठवड्याभरापूर्वी गायब झाली होती. दरम्यान, तिच्या आई वडिलांनी तिचा शोध घेऊनही तीचा शोध लागला नाही. सोमवार दि. 5 रोजी सकाळच्या वेळी एक महिला मुसळवाडी तलावालगतच्या सतिष शंकर सोनवणे यांच्या ऊस क्षेत्र भागात गवत आणण्यासाठी गेल्या असता, त्यांना मुंडके, डावा  हात  व डावा पाय नसलेला मृतदेह दिसला. महिलेने आरडाओरडा करताच ग्रामस्थांची गर्दी जमा झाली.

या घटनेची माहिती नागरिकांनी तात्‍काळ पोलिसांना कळवली. याप्रसंगी पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण भोसले, सविता सदावर्ते, पोलिस हवालदार बंडू बहिर, सतिष त्रिभूवन आदीं  घटनास्थळी दाखल झाले. याप्रसंगी रोहिदास वाघ यांनी घटनास्थळी दाखल होत पोलिसांपुढे आपल्या मुलीची ओळख सांगितली. पोलिस प्रशासनाने तातडीने श्‍वान पथक व वन विभागास घटनास्थळी तातडीने बोलाऊन घेतले. दुपारी उशिरापर्यंत पोलिस प्रशासन मुलीच्या मृत्यूबाबत ग्रामस्थांशी चौकशी करून घटनेचा उलगडा करण्याचा प्रयत्न करीत होते. सायंकाळच्या सत्रात मनिषा वाघ हिचे टाकळीमिया मध्ये घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या शवविच्छेदनाच्या अहवाल समोर आल्यानंतर घटनेची गुपीत समोर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.