Sun, Mar 24, 2019 16:55होमपेज › Ahamadnagar › आरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिसांना मज्जाव

आरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिसांना मज्जाव

Published On: Dec 17 2017 1:31AM | Last Updated: Dec 16 2017 11:45PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

आरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या कोतवालीच्या पोलिस पथकाला एकाने मज्जाव करून आरोपीस पळून जाण्यास मदत केली. शुक्रवारी (दि. 16) रात्री पावणेआठ वाजता स्टेशन रस्ता परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी चंदू उजागरे (रा. स्टेशन रस्ता, नगर) याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, कोतवाली पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांचे पथक शुक्रवारी रात्री पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी आकाश सरोदे यास कायदेशीर ताब्यात घेण्यासाठी स्टेशन रस्ता येथे गेले होते. 

पोलिसांचे पथक आरोपी सरोदे याच्याकडे विचापूस करीत होते. त्यावेळी उजागरे हा तेथे आला. ‘तुम्ही येथे का आला आहात. याला पकडायचे नाही. उद्या मी त्याला कोर्टात हजर करतो’, असे म्हणून उजागरे याने आरोपी सरोदे यास पळून जा, असे मोठ्याने ओरडून सांगितले. त्यामुळे सरोदे हा पळून जाऊ लागला. पोलिस त्याला पकडत असताना उजागरे याने पथकातील एकाच्या हाताच्या दंडाला धरून पकडण्यास मज्जाव केला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी रवींद्र टकले यांच्या फिर्यादीवरून चंदू उजागरे याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून आरोपीच्या अटकेत मज्जाव केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अभय परमार हे करीत आहेत.