Mon, May 20, 2019 22:29होमपेज › Ahamadnagar › आयुर्वेद कॉर्नरजवळ तलवारीने खुनी हल्ला

आयुर्वेद कॉर्नरजवळ तलवारीने खुनी हल्ला

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 10:26PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

आयुर्वेद कॉर्नरजवळ काही जणांच्या टोळक्याने जावेद शेख यांच्यावर शनिवारी (दि. 9) रात्री खुनी हल्ला केला. डोक्यात तलवारीचा वार बसून गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  याप्रकरणी मतीन शेख, इम्रान शेख, अली शेख, गैस शेख, जरीफ शेख, साजीद शेख, हबीब पत्रावाला, सरदार पठाण (सर्व रा. सर्जेपुरा, नगर) यांच्याविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

जखमी जावेद कासम शेख (वय 39, रा. भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जुन्या भांडणातून जमावाने शेख यांना शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आयुर्वेद कॉर्नरजवळ अडविले. तेथे तलवार व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत शेख यांच्या डोक्यात तलवारीचा वार बसला. त्यामुळे गंभीर दुखापत झाल्याने तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. यापूर्वी त्यांच्यात वाद झालेले होते. मजखमी शेख यांच्या जबाबावरून कोतवाली पोलिस ठाण्यात रविवारी (दि. 10) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कल्पना शिरदावडे या करीत आहेत.