Thu, Nov 15, 2018 21:12होमपेज › Ahamadnagar › 'त्या' अत्याचार प्रकरणातील आरोपी बर्डे दोषी

'त्या' अत्याचार प्रकरणातील आरोपी बर्डे दोषी

Published On: Aug 03 2018 6:45PM | Last Updated: Aug 03 2018 6:45PMनगर: प्रतिनिधी

पावणे तीन वर्षांच्या चिमुरडीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार  प्रकरणातील आरोपी बाळू गंगाधर बर्डे (रा. राहुरी) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. 3) दोषी ठरवले. मंगळवारी शिक्षेवर अंतिम युक्तिवाद होऊन आरोपीस शिक्षा ठोटावली जाईल.

डिसेंबर 2016 मध्ये  रेल्वे स्टेशन परिसरातून पावणे तीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केला होता.  या घटनेमुळे शरीराला आतून गंभीर इजा झाल्याने तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. आरोपीबाबत कोणतीही माहिती नसतानाही कोतवाली पोलिसांनी सखोल तपास करून बाळू गंगाधर पाटील यास  संशयित म्हणून अटक केली होती. बर्डे यांच्याविरुद्ध पुरावे मिळाल्यानंतर तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.  खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता अर्जुन पवार यांना काम पाहिले. न्यायालयाने  शुक्रवारी सायंकाळी आरोपी बर्डे यास अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरविले. मंगळवारी अंतिम युक्तिवाद होऊन आरोपीस शिक्षा ठोठावली जाईल. या प्रकरणात 'पुढारी'ने सुरुवातीपासून पाठपुरावा केला होता.