Tue, Nov 13, 2018 04:49



होमपेज › Ahamadnagar › छावणी चालकांचे धाबे दणाणले

छावणी चालकांचे धाबे दणाणले

Published On: Dec 03 2017 1:10AM | Last Updated: Dec 02 2017 11:26PM

बुकमार्क करा





नगर : प्रतिनिधी

2012-13 व 2013-14 साली दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात चारा छावण्या सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र या छावण्यांचा हिशेब ठेवतांना त्यात अनियमितता आढळून आल्या. उच्च न्यायालयाने याबाबत तत्कालीन छावणी चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यातील बड्या छावणी चालकांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा प्रशासनाने याबाबत गुन्हे दाखल करण्याचे पत्र तहसीलदारांना दिले आहे.

दोन महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनास अनियमितता आढळून आलेल्या सर्व चारा छावण्यांच्या चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाने याबाबत तहसीलदारांना पुढील कारवाई करण्याचे कळविले होते. मात्र कारवाईबाबत संभ्रम असल्याने तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. मात्र अनियमितता असलेल्या चारा छावणी चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश असल्याने त्यांच्यावर सरसकट गुन्हे दाखल करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांना कळविले आहे.

तत्कालीन चारा छावण्या ह्या बाजार समित्या, सहकारी सोसायट्या, पतसंस्था, सामाजिक प्रतिष्ठान, सार्वजनिक वाचनालये, दूध उत्पादक संस्था, चारोधाम ट्रस्ट, समाज प्रबोधन संस्था, मजूर सहकारी संस्था, बचत गट, स्वातंत्र्यसैनिक संस्था यांच्यामार्फत चालविण्यात येत होते. त्यावेळी या संस्थांवर पदाधिकारी असलेल्यांपैकी अनेक जण हे राजकारणात असून, कित्येकांचे चांगले राजकीय वजन आहे. जिल्ह्यात अशा 426 चारा छावण्या त्यावेळी अस्तित्वात होत्या. आता आदेश निघाल्याने गुन्हे कधी दाखल होणार? याचीच उत्सुकता आहे.