Fri, Feb 22, 2019 07:54होमपेज › Ahamadnagar › खुनानंतर कपडे, हत्यारे ओढ्यात फेकून दिली

खुनानंतर कपडे, हत्यारे ओढ्यात फेकून दिली

Published On: Dec 21 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 11:12PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

जवखेडे तिहेरी हत्याकांडातील आरोपी अशोक दिलीप जाधव याने खुनानंतर कपडे व हत्यारे मिरी हद्दीतील ओढ्यात टाकून दिली होती. तशी माहिती आरोपीने दिल्यानंतर त्याला घटनास्थळी नेऊन कपडे हस्तगत केली व त्याचा पंचनामा केल्याचे पंचसाक्षीदाराने न्यायालयात सांगितले.

प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांनी जवखेडे तिहेरी हत्याकांडाची सुनावणी सुरू आहे. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी पंच साक्षीदार सुरेश बर्डे यांची सरतपासणी घेतली व त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी उलटतपासणी घेतली. सरतपासणीत पंचांनी घटनाक्रम न्यायालयात सांगितला. ते म्हणाले की, आरोपीने पोलिस उपअधीक्षक वाय. डी. पाटील यांना कपडे व हत्यारांची माहिती दिल्यानंतर पोलिस ताफा आरोपीला घेऊन ओढ्यात गेला. तेथे आरोपीने कपडे टाकली होती. ती कपडे मिळाली. गुन्ह्यात वापरलेली हत्यारेही येथेच टाकल्याची कबुली दिली. परंतु, ती हत्यारे मिळून आली नाहीत. सकाळच्या सत्रात सरतपासणी झाल्यानंतर दुपारच्या सत्रात उलटतपासणी झाली. गुरुवारीही या खटल्यातील सुनावणी होणार आहे.