Tue, Nov 20, 2018 02:03होमपेज › Ahamadnagar › रायतळे येथून पाच दरोडेखोर जेरबंद

रायतळे येथून पाच दरोडेखोर जेरबंद

Published On: Dec 17 2017 1:31AM | Last Updated: Dec 16 2017 11:41PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

नगर व पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने पारनेर तालुक्यातील रायतळे शिवारातून पाच सशस्त्र दरोडेखोर पकडले. अंधाराचा फायदा घेऊन तीन जण पसार झाले. काल (दि. 16) पहाटे पावणेपाच वाजता ही कारवाई करण्यात आली. यातील गिरीश काळे हा ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपी आहे. अटक केलेल्यांमध्ये गिरीश आलम काळे (रा. निघोज, ता. पारनेर), किशोर मंत्री चव्हाण, नवनाथ हातण्या भोसले (दोघे रा. वाघुंडे, ता. पारनेर), दत्तू अरुण भोसले (रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा), गंगाधर संदल चव्हाण (रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) यांचा समावेश आहे. देवा ऊर्फ पावल्या कैलास काळे, तुषार कैलास काळे, शरद कैलास काळे (तिघे रा. पाडळी, ता. पारनेर) हे तिघे पसार झाले आहेत. एक लोखंडी सूरा, दोन लोखंडी गज, मिरची पूड, तीन मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, सहाय्यक निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, एन. आर. जगताप, गणेश क्षीरसागर, उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले आदींच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी सुनील चव्हाण यांच्या फिर्यादीवरून दरोड्याच्या तयारीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  पोलिसांनी पकडलेले दरोडेखोर सराईत असून, त्यांच्याविरुद्ध नगरसह पुणे जिल्ह्यात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांचे पथक कॉम्बिंग ऑपरेशन राबवून परतत असताना सुपा-अस्तगाव रस्त्यावर रायतळे शिवारातील घाटाच्या लवणाजवळ काही दरोडेखोर दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पवार यांना समजली. त्यावरून पोलिसांच्या पथकाने सापळा रचून पाच जणांची सशस्त्र टोळी पकडली.