Sat, Jan 19, 2019 22:05होमपेज › Ahamadnagar › मलनिस्सारण प्रकल्प  प्रक्रिया लांबणीवर

मलनिस्सारण प्रकल्प  प्रक्रिया लांबणीवर

Published On: Jan 20 2018 1:38AM | Last Updated: Jan 19 2018 11:26PMनगर : प्रतिनिधी

अमृत योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेल्या मलनिस्सारण प्रकल्प व भुयारी गटार योजनेच्या कामासाठी दोनच निविदा दाखल झाल्यामुळे 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत 3 निविदा दाखल झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची वेळ मनपावर येणार आहे. त्यामुळे मलनिस्सारण प्रकल्प लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

124 कोटींच्या या प्रकल्पासाठी राबविण्यात आलेली पहिली निविदा प्रक्रिया कागदपत्रांचे कारण पुढे करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने रद्द केली होती. त्यानंतर नव्याने निविदा मागविण्यात आला. 18 जानेवारीला त्याची मुदत संपली. मात्र, दोनच निविदा दाखल झाल्यामुळेनिविदा दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. पहिल्या मुदतवाढीत 3 निविदा दाखल झाल्या तरच पुढील कार्यवाही होणार आहे. अन्यथा निविदेसाठी दुसर्‍यांदा मुदतवाढ देण्याची वेळ येणार आहे.