होमपेज › Ahamadnagar › नगरसेवक गिरवले मृत्यू प्रकरणाचा सीआयडी तपास सुरू

नगरसेवक गिरवले मृत्यू प्रकरणाचा सीआयडी तपास सुरू

Published On: Apr 17 2018 3:38PM | Last Updated: Apr 17 2018 3:37PMनगर : प्रतिनिधी 

नगरसेवक कैलास गिरवले मृत्यूप्रकरणाचा तपास 'सीआयडी'कडून सुरू करण्यात आला आहे. मयत गिरवले यांची पत्नी, मुलीसह जवळचे नातेवाईक कोतवाली पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून बसले असून, आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

तपास सीआयडीकडे असल्याने तुमच्या तक्रार अर्जाची नोंद स्टेशन डायरीला घेऊन सीआयडीकडे देऊ, असे पोलिसांनी सांगितले मात्र नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने सीआयडीचे अधिकारी कोतवालीकडे निघाले आहेत. गुन्हा दाखल होईपर्यंत अंत्यविधी करणार नाही, अशी नातेवाईकांची भूमिका आहे. सीआयडीने एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कोठडी व पोलिस अधीक्षक कार्यालयात पाहणी केली आहे.