Fri, Jul 19, 2019 05:04होमपेज › Ahamadnagar › केडगावच्या विकासासाठी कटिबद्ध

केडगावच्या विकासासाठी कटिबद्ध

Published On: Dec 16 2017 1:38AM | Last Updated: Dec 16 2017 12:53AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

केडगाव उपनगराचा पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर विकास करण्याचे माजी महापौर संदीप कोतकर यांनी पाहिलेले स्वप्न आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. केडगावच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन माजी दपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी केले. केडगावमधील भूषणनगर येथील प्रभाग क्र.31 व 32 मध्ये सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी नगरसेविका सविता कराळे, अशेाक कराळे, बाबुराव कराळे, कृष्णा लांडे, केतल शेंडगे आदी उपस्थित होते. मूलभूत विकास निधीतून प्रभाग क्र.32 मधील वैश्णवनगर ते दत्तचौक, शिवाजीनगर टप्पा1 मुख्य रस्ता, प्रभाग क्र.31 मधील दत्त चौक, शिवाजीनगर ते लिंक रोड, भूषणनगर टप्पा2, तसेच जयहिंदनगर, माधवनगर, आयोध्यानगर अंतर्गत रस्ते डांबरीकरण व मजबुतीकरण कामास काल सुरुवात करण्यात आली. यावेळी कोतकर म्हणाल्या की, भूषणनगर परिसरात यापूर्वी महिलांसाठी व्यायामशाळा, मुलांसाठी बगिचा आदी कामे काँगे्रस-राष्ट्रवादीच्या माध्यमातून झालेली आहेत. माजी महापौर संदीप कोतकर यांचे केडगावच्या विकासाचे स्वप्न आम्ही पूर्णत्वाकडे नेत आहोत.