Sun, Mar 24, 2019 17:03होमपेज › Ahamadnagar › ढगाळ वातावरण अन् दिवसभर जोरदार वारे

ढगाळ वातावरण अन् दिवसभर जोरदार वारे

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 06 2017 12:51AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम राज्यभरासह नगर जिल्ह्यातही जाणवत आहे. काल दिवसभर ढगाळ वातावरण आणि जोरदार वारे, यामुळे नागरिक हैराण झाले होते. ढगाळ वातावरणामुळे रब्बीच्या पिकांवर परिणाम होणार असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. ‘ओखी’ चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रात वळाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या चक्रीवादळामुळे उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात बुधवारपर्यंत वाळी पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविलेली आहे. 

काल सकाळपासूनच नगर जिल्ह्याच्या सर्वच भागात ढगाळ वातावरण असून, जोरदार वारे वाहत आहे. त्यामुळे थंडी काही प्रमाणात कमी झाल्याचे जाणवत असलेतरी, या झोंबणार्‍या वार्‍यामुळे हुडहुडी भरत आहे. जिल्ह्यातील काही भागात तुरळक सरीही पडल्या. दरम्यान, ढगाळ हवामानामुळे थंडीवर परिणाम झाल्याने रब्बीच्या पिकांना रोगराईचा धोका निर्माण झाल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.