Tue, Jul 23, 2019 04:06होमपेज › Ahamadnagar › शहरात ख्रिसमस उत्साहात

शहरात ख्रिसमस उत्साहात

Published On: Dec 26 2017 1:31AM | Last Updated: Dec 25 2017 10:16PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचे शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. शहरातील प्रमुख चर्चमध्ये मध्यरात्री विशेष प्रार्थनेचे आयोजन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विविध चर्चमध्ये काल विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. ख्रिस्ती बांधव कुटुंबीयांसह या सोहळ्यात सहभागी झाले होते.

ख्रिश्‍चन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र आणि आनंदोल्हासाचा सण अर्थात नाताळ. ख्रिसमसचा मूळ अर्थ आहे, ख्राईस्ट मास. येशूच्या (ख्रिस्त) जन्मदिनानिमित्त विशेष प्रार्थना करण्यात येते. शहरातील सर्वच चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती. रविवारी संगीत मैफलींचे आयोजन करण्यात आले होते. जन्मोत्सव मध्यरात्री फटाक्यांची आकाशबाजी करून साजरा करण्यात आला. एकमेकांना शुभेच्छा देत ख्रिसमस साजरा करण्यात आला. सोमवारी (दि.25) सकाळी विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते.चर्चचे पालक व पाळक यांनी शुभसंदेश दिला.  

पहिली मंडळी काँग्रीनेशन, जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील संत अन्ना चर्च, तारकपूर येथील सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रल चर्च, चितळे रस्त्यावरील कोकराची मंडळी चर्च, भिंगार येथील चर्चमध्ये ख्रिसमस उत्साहात साजरा करण्यात आला.नाशिक धर्मप्रांतचे बिशप प्रदीप कांबळे यांनी हातमपुरा येथील सीएनआय चर्चमध्ये विशेष संदेश दिला. पाळक देवदत्त कसोटे, सुनील नन्नवरे, बोनी शिंदे, अतुल गवारे, सुधीर जाधव, रोनक लोंढे, एडविन पिंटो आदी उपस्थित होते.  क्रिकेट, रांगोळी, चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सभासदांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.