Wed, Aug 21, 2019 01:53होमपेज › Ahamadnagar › बंदोबस्ताला गेले अन् दरोडेखोर पकडले

बंदोबस्ताला गेले अन् दरोडेखोर पकडले

Published On: Dec 05 2017 1:49AM | Last Updated: Dec 05 2017 12:29AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील देवगड येथे दत्त जयंतीसाठी बंदोबस्ताला गेलेल्या पोलिस पथकाने दरोड्याच्या तयारीतील 5 जणांची टोळी जेरबंद केली. स्थानिक गुन्हे शाखा व नेवासा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. अटक केलेल्यांमध्ये कृष्णा भानुदास साठे (वय 38, रा. ओझर, गंगापूर, जि. औरंगाबाद), रोहीत विलास सौदागर (वय 25, रा. वार्ड नंबर 2, श्रीरामपूर), सागर सुरेश कांबळे (वय 26, रा. रामनगर, श्रीरामपूर), बजरंग रघुनाथ पवार (वय 24, रा. माणिकदौंड, ता. पाथर्डी), अशोक नवनाथ पवार (वय 26, रा. नाथनगर, पाथर्डी) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, घातक हत्यारे हस्तगत करण्यात आली.

बंदोबस्तावर असताना स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांना मुरमे ते मडकी रोडवरील वळण रस्त्यावर काही जण दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिस निरीक्षक दिलीप पवार व नेवासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण लोखंडे आदींच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गोर्डे यांच्यासह उपनिरीक्षक सुधीर पाटील, कर्मचारी सुनील चव्हाण, योगेश गोसावी, संभाजी कोतकर, संदीप पवार, राहुल हुसळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.