Fri, Apr 26, 2019 09:37होमपेज › Ahamadnagar › त्या पोलिस निरीक्षकाची उचलबांगडी

त्या पोलिस निरीक्षकाची उचलबांगडी

Published On: Aug 15 2018 8:17PM | Last Updated: Aug 15 2018 8:17PM नगर : प्रतिनिधी

फसवणुकीचे बळी पडलेले व सरकारी वर्दी चोरीला गेलेले  पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातून त्यांच्याकडे ट्रायल मॉनिटरिंग सेल येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अनेक पोलिस  ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची आज दुपारी  पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी बदल्या केल्या आहेत.  फसवणुकीचे बळी ठरलेले व त्यानंतर सरकारी वर्दी चोरीस गेल्याची फिर्याद देणाऱ्या ओमासे यांची शेवगाव येथून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर जिल्ह्यात नव्याने दाखल झालेले पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिस ठाणेनिहाय नवीन नियुक्त अधिकाऱ्यांची नावे  पुढील प्रमाणे: पाथर्डी- रमेश रत्नपारखी, डीएसबी- राजेंद्र पाटील, सुपा- राजेंद्र चव्हाण,  कर्जत- राजेंद्र भोसले,  कोपरगाव शहर- राकेश मानगावकर, शिर्डी शहर वाहतूक शाखा- गोकुळ अवताडे, श्रीरामपूर शहर- श्रीहरी बहिरट, राहाता- अरुण परदेशी, लोणी- प्रवीण पाटील,  सायबर- बाळकृष्ण कदम,  शनिशिंगणापूर- ललित पांडुळे,  घारगाव- अंबादास भुसारे,  श्रीरामपूर तालुका- दौलत जाधव,  आर्थिक गुन्हे शाखा- अनिल कटके,  मानव संसाधन- वसंत पथवे,  एएसटीयु- वसंत भोये, दहशत विरोधी सेल- विकास वाघ, ट्रायल मॉनिटरिंग सेल- गोविंद ओमासे, नियंत्रण कक्ष- दिलीप निघोट.