Wed, Jul 17, 2019 18:24होमपेज › Ahamadnagar › महिलेला विवस्त्र करून मारहाण

महिलेला विवस्त्र करून मारहाण

Published On: Dec 20 2017 1:38AM | Last Updated: Dec 20 2017 12:30AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

संपत्तीच्या वादातून केडगावातील महिलेचे कपडे फाडून तिला नग्न करून बेदम मारहाण करण्यात आली. तसेच घरातील कागदपत्रे जाळून टाकून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेले. शाहूनगर परिसरात रविवारी (दि. 17) दुपारी साडेतीन वाजता हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात भागचंद सोनाजी शिरसाट, मोहन  बनगे, गणेश भागचंद शिरसाट, पौर्णिमा महेश बनगे, रंभा ज्ञानदेव बनगे, संगीता कांबळे, अमोल नवनाथ कांबळे, राजू नवनाथ कांबळे, साखराबाई प्रकाश सोनवणे, राजसबाई देवराम मगर, विजय देवराम मगर, रमेश लक्ष्मण गावडे, राजू रमेश गावडे, अमोल रमेश गावडे (सर्व रा. केडगाव, नगर) यांच्याविरुद्ध दरोडा, विनयभंग, जाळपोळ, नुकसान करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड हे करीत आहेत.

याबाबत सदर महिलेने पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुमारे 14 जणांचा जमाव शाहुनगरमध्ये श्री दत्त मंदिरासमोर असलेल्या महिलेच्या घरी गेला. त्यांनी संपत्तीच्या वादातून महिलेला शिवीगाळ, दमदाटी करून तिचे कपडे फोडले. त्यानंतर नग्न करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच महिलेच्या घराची मातीची खोली पाडली व तिच्याकडील कोर्टातील दाव्याशी संबंधित कागदपत्रे जाळून टाकली. त्यानंतर डब्यातील 25 हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्याच्या दोन अंगठ्या, एक सर, दोन ब्रासलेट असा ऐवज लांबविला.