होमपेज › Ahamadnagar › चोरट्यांनी साधला लग्नसोहळ्याचा मुहूर्त!

चोरट्यांनी साधला लग्नसोहळ्याचा मुहूर्त!

Published On: Dec 12 2017 2:03AM | Last Updated: Dec 11 2017 11:19PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

लग्नसोहळ्याचा मुहूर्त साधून सोमवारी (दि. 11) दुपारी सोनसाखळी चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातून 9 तोळे वजनाचे सोन्याचे लांबविले. सपकाळ हॉस्पिटल रस्ता व निर्मलनगर परिसरात दुचाकीवरून भरधाव वेगात आलेल्या चोरट्यांनी हात साफ केला. 

प्रिती मैड (रा. लोणी प्रवरा, ता. राहाता) या लग्नसमारंभासाठी सोमवारी नगरला आल्या होत्या. ते आटोपल्यानंतर मैड या पायी गुलमोहोर रस्त्याने जात असताना सपकाळ हॉस्पिटलजवळून जात असताना एका दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातून 6 तोळ्याचे सोन्याचे गंठण ओरबाडून घेतले. त्यानंतर विना नंबरच्या दुचाकीवरील दोन्ही चोरटे पसार झाले. 

दुसरी घटना निर्मलनगर परिसरात घडली. ज्योती शंकर हिंगणे हे निर्मलनगर परिसरातील भगवान बाबा चौकातील गंगा लॉन येथे लग्नाला आल्या होत्या. लॉनच्या बाहेर रस्त्याच्या कडेने हिंगणे या जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 3 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. या दोन्ही घटनांबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात जबरी चोरीचे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.