Mon, Jul 22, 2019 23:59होमपेज › Ahamadnagar › आरोपींच्या गाडी मोबाईलचा होणार लिलाव

आरोपींच्या गाडी मोबाईलचा होणार लिलाव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर :प्रतिनिधी

कोपर्डी अत्याचार व खूनप्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावल्या आरोपींची दुचाकी व मोबाईलचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावात या वस्तूंना मिळणारी रक्कम सरकारी तिजोरीत जमा होणार आहे. प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान एका आरोपीला दंड आकाराला होता. तो दंडही वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कोपर्डी निर्भयाकांडचा न्यायालयात युक्तिवाद सुरु असतांना आरोपी संतोष भवाळ यांचे वकील सुनावणीला अनुपस्थित होते. याप्रकरणी न्यालयाने संतोष याला दंड ठोठावला होता.

अद्यापपर्यंत दंडाची रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली नव्हती. दंडाची रक्कम भरलेली नसल्याने ती वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे हा दंड आरोपीच्या दुचाकी व मोबाईलच्या लिलावातून वसूल करण्यात येणार आहे. या प्रकरणातील आरोपींना दोषी ठरविल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने काल (दि. 29) तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.