Thu, Jun 27, 2019 13:39होमपेज › Ahamadnagar › मागील सत्ताधार्‍यांमुळे फेज २ चे काम रखडले

मागील सत्ताधार्‍यांमुळे फेज २ चे काम रखडले

Published On: Dec 12 2017 2:03AM | Last Updated: Dec 11 2017 11:10PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

फेज 2 पाणीयोजनेचे काम 4 वर्षांपूर्वी पूर्ण झाले असते. मात्र, मागील सत्ताधार्‍यांच्या आडमुठ्या धोरणामुळे हे काम मार्गी लागू शकले नाही, असा आरोप महापौर सुरेखा कदम यांनी केला. कल्याण रस्त्यावरील साईराम सोसायटीत फेज-2, ड्रेनेजलाईन व रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ महापौर कदम यांच्या हस्ते झाला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, सभागृहनेते गणेश कवडे, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, गटनेते संजय शेंडगे, नगरसेविका उषा ठाणगे, शरद ठाणगे आदी उपस्थित होते.

नगरसेविका उषा ठाणगे म्हणाल्या की, या भागातील पाणीप्रश्‍न गंभीर आहे. नागरिकांना 8 दिवस पाणी मिळत नाही. फेज 2चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु, टाकीत पाणीच आले नाही.  30 तारखेच्या आत ही टाकी सुरू करावी, अन्यथा मनपासमोर उपोषण करावे लागेल. त्यावर  महापौर कदम म्हणाल्या की, कल्याण रस्ता परिसर लवकरच टँकरमुक्त करू. नगरसेविका उषा ठाणगे व शरद ठाणगे यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही. सभागृहनेते गणेश कवडे म्हणाले की, 30 डिसेंबरच्या आतापाण्याची टाकी सुरू न झाल्यास ठेकेदारावर कारवाई केली जाईल.