Tue, May 21, 2019 23:04होमपेज › Ahamadnagar › नितीनच्या न्यायासाठी कायदेशीर पाठपुरावा

नितीनच्या न्यायासाठी कायदेशीर पाठपुरावा

Published On: Dec 12 2017 2:03AM | Last Updated: Dec 11 2017 11:13PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

नितीन आगे याला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाईसाठी सज्ज राहून, न्यायालयात योग्य विधिज्ञांची मदत घेऊन कायदेशीर पाठपुरावा करण्याचा निर्णय जातीय अत्याचार विरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 हमाल पंचायत येथे आयोजित बैठकीत बोलताना दाभोळकर म्हणाले की, नितीन आगेला न्याय न मिळणे हे दुर्देवी आहे. त्याच्या न्यायासाठी रस्त्यावरच्या लढाईबरोबरच न्यायालयीन पाठपुरावा करणारी टीम असायला हवी. जेणेकरून त्याला योग्य न्याय मिळेल. चांगली विधीतज्ज्ञांची मदत घेऊन आपण न्यायालयात पाठपुरावा करू. 

मयत नितीनचे वडील राजू आगे म्हणाले की, नितीनचा खून झाला हे न्यायालय मान्य करते. आरोपी निर्दोष सुटले, पण नितीनचा खून नेमका कुणी केला. त्याला न्याय मिळाला पाहीजे.
या बैठकीत नितीन आगेचा खटला रीओपन करण्यासाठी पाठपुरावा करणे, न्यायालयीन लढाईसाठी अभ्यासूंची टीम तयार करणे, त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याचे निश्‍चित करण्यात आले. यावेळी कॉ. बाबा आरगडे, अ‍ॅड. अरुण जाधव, मिलिंद देशमुख, अ‍ॅड. रंजना गवांदे, कॉ. मेहबुब सय्यद, अशोक सब्बन, बापू ओहोळ, संध्या मेढे, प्रमोद काळे आदी सामाजि कार्यकर्ते उपस्थित होते.