होमपेज › Ahamadnagar › खंडपीठाने मागविले ‘त्या’ याचिकेचे रेकॉर्ड!

खंडपीठाने मागविले ‘त्या’ याचिकेचे रेकॉर्ड

Published On: Dec 20 2017 1:38AM | Last Updated: Dec 20 2017 12:20AM

बुकमार्क करा

नगर ः प्रतिनिधी

‘कायनेटिक इंजिनिअरिंग’ने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने लिलावाला दिलेली स्थगिती 11 जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे. मनपाने या प्रकरणी म्हणणे सादर केल्यानंतर ‘कायनेटिक’ने जिल्हा न्यायालयातील याचिकेची मूळ कागदपत्रे रेकॉर्डवर घेण्याची मागणी केली होती. ती मान्य करत खंडपीठाने सर्व कागदपत्रे रेकॉर्डवर घेण्याचे आदेश दिले आहेत.

मनपाने 3.33 कोटींच्या थकबाकीपोटी ‘कायनेटिक’ला टाळे ठोकले आहे. मालमत्ता कराच्या आकारणीबाबत जिल्हा न्यायालयाने कायनेटिकची मागणी फेटाळत मनपाची मागणी ग्राह्य ठरविली होती. त्यानंतर मनपाने पुन्हा कायनेटिकचा लिलाव जाहीर केला. त्यानंतर कायनेटिकने पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन लिलावाला स्थगिती मिळविली होती. काल (दि.19) मनपाने याचिकेत म्हणणे सादर केल्यानंतर कायनेटिकनेही पुन्हा म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितली. तसेच जिल्हा न्यायालयातील मूळ याचिकेची कागदपत्रे रेकॉर्डवर घेण्याची मागणी केली. खंडपीठाने ही मागणी मान्य करत 11 जानेवारीपर्यंत लिलावाची स्थगिती कायम ठेवली आहे.