Wed, Mar 27, 2019 02:13होमपेज › Ahamadnagar › न्या. लोया यांना नागपुरात पोलिस संरक्षण का नव्हते

न्या. लोया यांना नागपुरात पोलिस संरक्षण का नव्हते

Published On: Jan 30 2018 2:16AM | Last Updated: Jan 30 2018 2:10AMनगर  :प्रतिनिधी

न्या. ब्रिजमोहन लोया यांचा मृत्यू तर संशयास्पद आहे. न्या. लोया नागपुरात असताना त्यांना पोलिस संरक्षण का नव्हते, असा सवाल माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी केला आहे. पुरोगामी विचारांच्या सर्वांनी एकत्र येऊन राज्यघटनेच्या संवर्धनासाठी संघटित झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे. शब्दगंध साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी न्या. कोळसे-पाटील बोलत होते. संमेलनाध्यक्ष माजी सनदी अधिकारी भारत सासणे, स्वागताध्यक्ष राजेंद्र उदागे, डॉ. जयदेव डोळे, लहू कानडे, कॉ. स्मिता पानसरे आदी  उपस्थित होत्या.

न्या. कोळसे म्हणाले, भारतीय राज्यघटनेतील तत्त्वांच्या विरोधात सध्या देशातील अर्थनीती राबविली जात आहे. देशातील एक टक्के लोकांकडे 73 टक्के संपत्ती एकवटली आहे. भारत सासणे म्हणाले, समाजामधील वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. समाज दिशाहिन होत आहे. समाजातील सर्व घटक मौन साधून आहेत. समाजाने एक पलायनवाद स्वीकारला आहे. त्यामुळे जागृती कशी होणार, ही परिस्थिती घातक आहे. साहित्य माणसाला जागृत करू शकतो. जगात झालेल्या क्रांतीमध्ये साहित्यिकांची भूमिका मोठी राहिलेली आहे. याची जाणीव ठेवून साहित्यिकांनी समाज जागृतीचे  काम करावे.