Thu, Feb 21, 2019 17:54होमपेज › Ahamadnagar › धोरण बदलासाठी संघटित व्हा

धोरण बदलासाठी संघटित व्हा

Published On: Dec 12 2017 2:03AM | Last Updated: Dec 11 2017 11:27PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेती धंदा उध्वस्त झाला आहे. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. कर्जमाफी मिळत नाही. वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरु आहे. सरकारचे शेतीविरोधी धोरण बदलून शेतकरी व शेती व्यवसायाला स्वतंत्र धोरण मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी संघटित होण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले. याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्य सरकारने शेतकर्‍यांना देऊ केलेली कर्जमाफी मिळालीच नाही. शेतकर्‍यांना न मिळालेल्या वीज बिलाची वसुली करण्यासाठी शेती पंपांची वीज खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. शेतमालाचे भाव पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतमालाची आयात केली जात आहे.

पाकिस्तानातून कांद्याची आयात करून भारतातील कांदा उत्पादक शेतकरी मारला जात आहे. परदेशात मागणी असलेल्या शेतमालावर निर्यातबंदी लादली जात आहे. शासन शेतमालाच्या आधारभूत किमती जाहीर करते मात्र त्यानुसार शेतमाल खरेदी करण्यासाठी शासनाकडे पुरेशी व्यवस्था नाही. आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी करण्यात व्यापार्‍यांना बंदी असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. नाविलाजाने शेतकर्‍यांना काळ्या बाजारात शेतमाल विकावा लागत आहे. छत्तीसगडप्रमाणे व्यापार्‍यांनी दिलेली किंमत किंवा आधारभूत किमतीतील फरक सरकारने द्यावा, अशी संघटनेची मागणी आहे.