Mon, Jun 17, 2019 18:16होमपेज › Ahamadnagar › प्रसुतीदरम्यान महिलेचा ‘सिव्हिल’मध्ये मृत्यू

प्रसुतीदरम्यान महिलेचा ‘सिव्हिल’मध्ये मृत्यू

Published On: Feb 14 2018 2:49AM | Last Updated: Feb 14 2018 12:15AMनगर : प्रतिनिधी

जिल्हा रुग्णालयात प्रसुतीदरम्यान बाळंतिणीचा मृत्यू झाला. सुदैवाने बाळ सुखरुप आहे. अतिरक्तस्त्रावाने हा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. सोमवारी (दि. 12) रात्री ही घटना घडली. ज्योती योगेश शिरसाठ (वय 31, रा. पाथर्डी) हे मयत महिलेचे नाव आहे. प्रसुतीसाठी त्यांना नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी रात्री तिची प्रसुती झाली. प्रसुतीदरम्यान अतिरक्तस्त्राव झाला. त्यात ज्योती यांचा मृत्यू झाला. सुदैवाने बाळ सुखरुप आहे. याबाबत वैद्यकीय अधिकार्‍यांनी अतिरक्तस्त्राव हे मृत्यूचे कारण असल्याचे स्पष्ट केले आहे. 

प्रसुती विभागात बेडची क्षमता अवघी 30 आहे. ते अपुरे पडते. त्यामुळे उपचार करताना डॉक्टरांचे धावपळ उडते, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बापूसाहेब गाढे यांचे मत आहे. सोमवारी रात्री नातेवाईकांनी डॉक्टरांनी आरोप केले होते.