Fri, Apr 19, 2019 07:57होमपेज › Ahamadnagar › निंबोडी, हिवरेझरे आणि देऊळगावात सत्तांत्तर

निंबोडी, हिवरेझरे आणि देऊळगावात सत्तांत्तर

Published On: Dec 28 2017 2:00AM | Last Updated: Dec 28 2017 2:00AM

बुकमार्क करा
नगर ः प्रतिनिधी

सहा ग्रामपंचायतींच्या निकालाने नगर तालुक्यातील राजकीय समीकरण बदलू लागले आहेत. निंबोडी, हिवरेझरे आणि देऊळगाव सिध्दी येथील सत्ताधार्‍यांना गावकर्‍यांनी चांगलाच धक्का दिला आहे.नवख्यांच्या हातात गावांचा कारभार दिला आहे. मेहेकरी व अरणगाव येथील सरपंचपद एका गटाला आणि सदस्याचे बहुमत मात्र दुसर्‍या गटाला देत, नव्याने निवडून आलेल्या सरपंचाची डाकेदुखी मात्र वाढविली आहे. माहे जानेवारी महिन्यात मुदत संपणार्‍या मेहेकरी, निंबोडी, देऊळगाव सिध्दी, अरणगाव, बारदरी व हिवरेझरे या ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. मुदत संपण्याच्या एक महिना अगोदर निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्या. त्यानुसार मंगळवारी (दि.26) मतदान प्रक्रिया पार पडली.

तहसील कार्यालयात काल (दि.27) सकाळीच तहसीलदार सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावनिहाय मतमोजणी झाली. यावेळी कडक पोलिस बंदोबस्त तैनात होता. निकाल ऐकण्यासाठी सहाही गावांतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. निवडून आलेल्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात होता. विजयी घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.  
बारदरी ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या सात जागा बिनविरोध झालेल्या आहेत. त्यामुळे सरपंचपदाचीच निवडणूक झाली होती. सरपंचपदासाठी दुरंगी लढत झाली. या लढतीत नितीन मलिकार्जुन जंगम यांनी बाजी मारली. त्यांनी प्रतिस्पर्धी संतोष विश्‍वनाथ वाकचौरे यांचा दणदणीत पराबव केला आहे. जंगम यांना 389 तर वाकचौरे यांना 103 मते पडली आहेत.गावकर्‍यांनी बारादरी ग्रामपंचायत पुन्हा सुधीर पोटे व अशोक पोटे यांच्या हाती सोपविली आहे.

अरणगावच्या सरपंचपदी स्वाती मोहन गहिले विजयी झाल्या आहेत. त्यांनी जिजाबाई ज्ञानेव शेळके याचा पराभव केला आहे.गहिले यांना 432 तर शेळके यांना 331 मते मिळाली आहेत. सदस्यपदी पोपट शिंदे, बबन शिंदे,मनिषा गहिले, संपत कांबळे,महेश पवार, शितल ससाणे, गणेश दळवी,वैशाली पुंड,लता शिंदे,सागर कल्हापुरे,मिरा कांबळे,नंदा करांडे व वर्षा कांबळे विजयी झाल्या आहेत. कांबळे केवळ दोन मतांनी विजयी झाल्या आहेत.  निंबोडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शंकर बाबासाहेब बेरड हे 992 मते घेवून बाजी मारली आहे. त्यांनी जयराम बेरड यांचा पराभव केला आहे. जयराम बेरड यांना 903 मते मिळाली आहेत. या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी विद्या भिंगारदिवे, शेख रेश्मा, पांडुरंग शेंडगे, शिवाजी बेरड,संगीता बेरड,भिमा बेरड, पारुबाई आवारे, शैलेश भोसले, संदीप पानसरे,जयश्री तडके विजयी झाले आहेत. 

देऊळगाव सिध्दी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हरिभाऊ केरु बुलाखे विजयी झाले आहेत. त्यांना 1 हजार 404 मते पडली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी बुलागे स्वप्नील यांना 1 हजार 96 मते पडली आहेत. सदस्यपदी नाना बोरकर, भीमराज सरगर, विद्या इंगळे, रींद्र कंडकर, संजय वाघमोडे, बाजीराव धायमुक्ते, आशा सुलाखे, मुक्ताबाई बोरकर, रामदास गिरवले, पार्वती देविकर हे विजयी झाले आहेत.  
मेहेकरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष पालवे निवडून आले आहेत. त्यांनी 750 मते घेत बाजी मारली आहे.

त्यांचे प्रतिस्पर्धी शंकर पालवे यांना 593 मते पडली आहेत. सदस्यपदी छगन कानडे, सोपान पालवे,मंगल पंडित, शरद बडे, अश्‍विनी आंधळे, सोनाली आंधळे, पांडुरंग वनवे, लहानुबाई पालवे व सुरेखा पालवे विजयी झाल्या आहेत.  हिवरेझरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा मान अनुजा मयुर काटे यांना मिळाला आहे. त्यांना 595 मते मिळाली असून, मंदाबाई काळे यांना फक्त 588 मते पडली आहेत. सदस्यपदी साहेबराव टकले, नाथा काळे, संगिता काळे,भाऊसाहेब काळे, नेहा काळे, गणेश साळवे, प्रतीक्षा आनंदकर, शिला पवार आदी विजयी झाले आहेंत.