Tue, Jul 16, 2019 02:02होमपेज › Ahamadnagar › नगरः तरूणाच्या खूनप्रकरणी आरोपीस आजन्म कारावास

नगरःखूनप्रकरणी आरोपीस आजन्म कारावास

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

संगमनेरः प्रतिनिधी 

शहरानजीक असणाऱ्या ढोलेवाडी येथील तरुणाच्या खूनप्रकरणी मुख्य आरोपी विनायक गणपत भोर यास येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधीश संजीव शर्मा यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. इतर चार आरोपींना प्रत्येकी दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी, दि 20 ऑगस्ट 2014 रोजी मुलीच्या एकतर्फी प्रेमप्रकरणावरून विनायक भोर याने संबधित मुलीचा भाऊ सूरज कैलास जाधव याचा चाकूने भोसकून खून केला होता. या संदर्भात साडेतीन वर्षानंतर खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात झाली. त्यात सरकारी पक्षाच्यावतीने दहा साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या, त्यात नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या वैदकीय अधिकारी डॉ गौतमी, फिर्यादी निलेश ढोले, प्रथमदर्शी साक्षीदार योगेश ढोले व नामदेव कुळधरण यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. 

त्यानंतर सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील मच्छिन्द्र गवते यांनी भक्कम पुरावे न्यायालयास सादर केले. त्यानंतर सर्वाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश संजीव शर्मा यांनी मुख्य आरोपी विनायक गणपत भोर यास आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. तर ज्ञानेश्वर मचिंद्र ढोले, मुकुंद भारत ढोले, प्रताप भारत ढोले, सागर शंकर ढोले या चौघांना 2 वर्ष कारावास आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने अधिक कारावास अशी शिक्षा सुनावली.