Thu, Jun 20, 2019 01:12होमपेज › Ahamadnagar › पत्नीसह मुलीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या

पत्नीसह मुलीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या

Published On: Mar 06 2018 2:37PM | Last Updated: Mar 06 2018 2:37PMनगरः प्रतिनिधी

येथील कोपरगावातील खडकी भागात पतीने पत्नी आणि लहान मुलीची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रंगपंचमीच्या सणादिवशीच सकाळी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. सुकेशनी ऊर्फ गौरी गणेश खरात आणि तीन वर्षाची मुलगी दिदी गणेश खरात अशी मयतांची नावे आहेत. गणेश भीमराव खरात असे त्या मारेकरी पतीचे नाव आहे.

या झटापटीत आरोपीची सासू गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटच्या लेकीचा आणि पत्नीचा खून करणारा हा नराधम स्व:ता पोलिस ठाण्यात हजर झाला होता.