Mon, Apr 22, 2019 03:44होमपेज › Ahamadnagar › श्रीपाद छिंदम नगर जिल्ह्यातून हद्दपार

श्रीपाद छिंदम नगर जिल्ह्यातून हद्दपार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदम याला नगर जिल्ह्यातून पंधरा दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी त्याला याबाबतची नोटीस बजावली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर छिंदम हा त्याच्या नगरमधील निवासस्थानी राहत होता. त्याच्या विधानामुळे जनमानसात रोष आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने छिंदम याला नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे, असा प्रस्ताव तोफखाना पोलिसांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. 

दंडाधिकाऱ्यांनी छिंदमला पंधरा दिवसांसाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश सोमवारी सकाळी जारी केला. त्या आदेशाची आज (सोमवार दि.02) दुपारी अंमलबजावणी करत तोफखाना पोलिसांनी छिंदमला नोटीस बजावली आहे.

दिल्ली गेट परिसरातील छिंदमच्या कार्यालयची व त्याच्या घरासमोर लावलेल्या मोटारसायकलची तोडफोड काही जणांनी केली होती. या तोडफोडप्रकरणी छिंदम याने रविवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी राजेंद्र नारायण दांगट, योगेश देशमुख, स्वप्निल दगडे, गोरख दळवी, भावड्या अनभुले, चेतन शेलार, विरेश तवले, रोहित गुंजाळ, धनंजय लोकरे, बाबासाहेब रोहकले, धनवान दिघे, हरिष भांबरे, गिरीष भांबरे यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Tags : nagar, shripad chindam, exile, nagar district, nagar news 


  •