होमपेज › Ahamadnagar › ‘होय आम्ही या खड्डेमय रस्त्यांचे लाभार्थी’

‘होय आम्ही या खड्डेमय रस्त्यांचे लाभार्थी’

Published On: Dec 15 2017 3:24PM | Last Updated: Dec 15 2017 4:35PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनीधी 

गेल्या ७ ते ८ वर्षापासून रस्त्याचे काम होत नसल्याने बारागाव नांदूर ग्रामस्थांनी ‘होय आम्ही लाभार्थी’ म्हणत फ्लेक्सबाजी करून आपला संताप व्यक्त केला. 

राज्यभरात सरकारने विकास कामे केल्याचे सांगत ‘होय, हे माझे सरकार’ म्हणून जाहिरातबाजी केली. त्याच जाहिरातीचा मुद्दा हाती घेत ग्रामस्थांनी होय, हे माझे सरकार म्हणत जाहीरातबाजी केली आहे. 

राहुरी येथील नगर मनमाड रस्त्यावर बारागाव नांदूरकडे जाणाऱ्या भागात सदरचे फ्लेक्स लावण्यात आले असून नागरीकांचे लक्ष वेधणाऱ्या फ्लेक्सकडे पाहून सरकार विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. 

काय आहे फ्लेक्समध्ये : 

* या रस्त्यामुळे शरीराच्या हाडांचे आजार जडल्याने डॉक्टरांचे रूग्ण वाढले, यामुळे डॉक्टरांचे रूग्ण वाढले. होय आम्ही या रस्त्यांचे लाभार्थी,

* या रस्त्यांमुळे अपघातामुळे काही कुटुंबे उघड्यावर आली तर काहींना कायमचे अपंगत्व आले, होय आम्ही या रस्त्यांचे लाभार्थी,

* अनेक वाहने नादुरूस्त होऊन वाहने अर्ध्या किंमतीत विक्री करावे लागले, होय आम्ही या रस्त्यांचे लाभार्थी,

* रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गावाचा विकास थांबला, खड्यात साचलेल्या पाण्यात आमचे चेहरे दिसतात होय आम्ही या रस्त्यांचे लाभार्थी, 

No automatic alt text available.