Wed, May 22, 2019 20:41होमपेज › Ahamadnagar › नगरः फाटके हॉस्पिटलमधील राऊत डॉक्टरांची आत्महत्या

नगरः फाटके हॉस्पिटलमधील राऊत डॉक्टरांची आत्महत्या

Published On: Jun 05 2018 11:57AM | Last Updated: Jun 05 2018 11:57AMनगरः प्रतिनिधी

नगर शहरातील फाटके हॉस्पिटल येथील डॉ. महेश राऊत (वय ४१) यांनी इंजेक्शन घेऊन हॉस्पिटलमध्येच आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.

मार्केट परिसरात असणाऱ्या फाटके हॉस्पिटल येथे डॉ. महेश राऊत यांनी आत्महत्या केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संबंधित डॉक्टरांकडून माहिती घेतली असून या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा म्हणाले की, आज सकाळी राऊत यांनी आत्महत्या केल्याचे समजले होते. त्यांच्याजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून त्यामध्ये त्यांनी आपण आर्थिक कारणांमुळे आत्महत्या करत आहोत, असे चिठ्ठीत लिहले आहे.

फाटके हॉस्पिटलमध्ये आज सकाळी दवाखान्यातील कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेला असता त्याला दार बंद असल्याचे आढळले. म्हणून त्याने जोरजोरात दार वाजवले. दार उघडले नाही म्हणून त्याने दार तोडून आत प्रवेश केल्यावर डॉक्टरांचा मृतदेह आढळून आला. त्याने या घटनेची माहिती अन्य डॉक्टरांना दिली व त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल असून पुढील तपास पोलीस करत आहेत.