Mon, Apr 22, 2019 06:03होमपेज › Ahamadnagar › कर्जाला कंटाळून शेतमजुराची आत्महत्या

कर्जाला कंटाळून शेतमजुराची आत्महत्या

Published On: Mar 26 2018 1:34AM | Last Updated: Mar 25 2018 10:54PMनगर : प्रतिनिधी

तालुक्यातील खातगाव टाकळी येथील शेतमजूर बापू नामदेव देठे (वय 55) यांनी कर्जाला कंटाळून काल (दि.25) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.  त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, तीन मुले असा परिवार आहे. बापू देठे हे खातगाव टाकळी परिसरात शेतमजूर म्हणून काम करत होते. त्यांच्या दोन मुलींचे नुकतेच लग्न झाले होते. या लग्नानंतर ते कर्जबाजारी झाले होते. सध्या उन्हाळ्याच्या परिस्थितीमुळे त्यांना मजुरी मिळत नव्हती.

त्यांच्यावर खासगी सावकरांचे कर्ज होते. देठे यांनी या कर्जाला कंटाळून काल (दि.25)सकाळी 10 वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पंचायत समिती सदस्य डॉ. दिलीप पवार, सरपंच मिठू कुलट, उपसरपंच ज्ञानेश्‍वर पठारे आदी तात्काळ घटनास्थळी आले. देठे यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु, ते उपचारापूर्वीच मयत झाले होते. 
एमआयडीसी पोलिस ठाण्यात या बाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैेवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली.