Wed, Nov 21, 2018 07:10होमपेज › Ahamadnagar › नगर : पोलिस निरीक्षकाला धक्काबुक्की

नगर : पोलिस निरीक्षकाला धक्काबुक्की

Published On: Aug 20 2018 3:51PM | Last Updated: Aug 20 2018 3:51PMनगर : प्रतिनिधी

शिर्डी वाहतूक शाखेचे  पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांना रिक्षाचालकाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.  शिर्डी कोपरगाव रस्त्यावरील एका हॉटेल समोर रविवारी दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली.

याप्रकरणी रिक्षाचालक विक्रम मुरलीधर दुफळे (रा. कोकमठाण, ता. कोपरगाव) यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, दुफळे यांनी त्याची रिक्षा  रस्त्यात आडवी उभी केली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तेथे उपस्थित असलेले पोलिस निरीक्षक औताडे यांनी चालकास रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. त्याचा राग आला व त्याने औताडे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.