Fri, Dec 14, 2018 00:12होमपेज › Ahamadnagar › 11 आरोग्य केंद्रांना पुरस्कार

11 आरोग्य केंद्रांना पुरस्कार

Published On: Mar 24 2018 1:45AM | Last Updated: Mar 24 2018 12:27AMनगर : प्रतिनिधी

राष्ट्रीय गुणवत्ता मानांकनाप्रमाणे सर्व प्रकारचे निकष पूर्ण करणार्‍या जिल्ह्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात कर्जत तालुक्यातील कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात प्रथम आले आहे. कुळधरण केंद्राला 2 लाख रुपये तर उर्वरित 10 केंद्रांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेचा विस्तार वाढत असतांना प्राथमिक आरोग्य केंद्रांनीही कात टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आरोग्य केंद्रांचे रूप पालटण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत होत आहे. सार्वजनिक आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात व अधिकारी, कर्मचार्‍यांनी त्यात सातत्य ठेवावे यासाठी शासनाने प्रोत्साहनपर बक्षीस योजना सुरु केली.

जिल्हा गुणवत्ता आश्वासन सल्लागार डॉ . राहुल शिंदे यांनी आरोग्य केंद्रांमध्ये झालेल्या बदलांचे फोटो, रेकॉर्ड व कायाकल्प परीक्षणाचा अहवाल राज्य स्तरावर पाठविला होता. सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांमुळे हे यश मिळाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

या केंद्रांना प्रत्येकी 50 हजार

काष्टी व आढळगाव (ता. श्रीगोंदा), पढेगाव, टाकळीभान,  निमगाव खैरी व माडवळगाव (ता. श्रीरामपूर), वाळकी व रुईछत्तीसी (ता. नगर), कोल्हार व दाढ बु. (ता. राहाता).
 

 

tags : nagar,news, National, Quality, Rating, Health ,Centers, Awards,