Fri, Mar 22, 2019 01:29
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › मराठा आरक्षणासाठी सहकार्य करावे

मराठा आरक्षणासाठी सहकार्य करावे

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 11:02PMनगर : प्रतिनिधी

आरक्षण हा मराठा समाजाचा घटनादत्त अधिकार आहे. आरक्षणाअभावी मराठा समाजातील तरूणांमध्ये बेकारी व नैराश्य वाढत आहे. त्यामुळे आरक्षण मिळण्यासाठी अडचणीतील ‘मराठा’ या मोठ्या भावास इतर लहान भावांनी सकारात्मक भावनेतून सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूरचे शिवशाहीर दिलीप सावंत यांनी केले. शिवप्रहार संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाईपलाईन रस्त्यावरील पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर चौकात (भिस्तबाग चौक) शिवजयंती उत्सवानिमित्त शिवशाहीर सावंत व सहकार्‍यांचा पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

महापौर सुरेखा कदम यांचे हस्ते व माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शिवशाहीर सावंत व सहकार्‍यांनी सादर केलेले पोवाडे व स्फुर्तीगीतांनी प्रचंड वाहवा मिळवित प्रेक्षकांना अडीच तास जागेवर खिळवून ठेवले. नगरच्या मातीत क्रांती करण्याची ताकद असून, भोर यांच्या अग्रणी सहभागातून कोपर्डी घटनेविरोधात उभे राहिलेल्या देशव्यापी आंदोलनाने ते सिद्ध केले आहे. मात्र, तरीही याच मातीत शिवरायांची बदनामी करणारे छिंदम सारखेही निपजतात. ही शोकांतिका असून, ही विकृती व तिचे पोशींदे नेस्तनाबूत करावे लागतील, असे सावंत म्हणाले.