Mon, Jul 15, 2019 23:41होमपेज › Ahamadnagar › अनैतिक संबंधातून खून

अनैतिक संबंधातून खून

Published On: Apr 24 2018 1:04AM | Last Updated: Apr 24 2018 12:06AMनेवासा : प्रतिनिधी 

नेवासा फाटा येथील त्या महिलेचा अनैतिक संबंधातूनच खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी गंगापूर (जि. औरंगाबाद) येथील एका जणास अटक केली आहे.

नेवासा फाटा परिसरातील समतानगर या भागात  संगीता विलास शिंदे (वय 40 )  रहात होत्या. त्या  हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे काम करीत असत. 17 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता हॉस्पिटल मधून आई बेपत्ता झाल्याची  नोंद त्यांच्या मुलाने  पोलिस स्टेशनला दिली होती.

19 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30वाजता वाळूंज औरंगाबाद मध्ये एमआयडीसी मध्ये जोगेश्वरी भागात एक्सटेंड कंपनीच्या मागे गट क्रमांक 183 मध्ये अज्ञात मृतदेह औरंगाबाद पोलिसांना मिळून आला सदरचा मृतदेह त्यांनी घाटी रुग्णालयात नेल्यानंतर याठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले. वाळूंज पोलीस ठाण्यात  पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी याबाबत  अज्ञात  व्यक्तीविरुद्ध महिलेचा गळा दाबून  खून केल्याची फिर्याद नोंदविली होती.  नेवासा पोलिस स्टेशनच्या माध्यमातून मयताची ओळख पटविण्यात आली होती. 

वाळूंज पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे व सहकार्‍यांनी मयताच्या मोबाईलच्या मदतीने गंगापूर येथील इम्रानखान इब्राहिमखान पठाण(वय 28) यास अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने सांगितले कि मयत संगिता शिंदे हिची माझी गेल्या एक वर्षांपासून ओळख झालेली होती. 17 एप्रिलला माझ्या ताब्यातील टाटा (एमएच.20-ए ॠ/3160) गाडी नगरहून औरंगाबादकडे येत असतांना अनैतिक संबंधासाठी मयत संगितास गाडीत घेवून जात होतो. 

रस्त्यामध्ये पैशावरून दोघांत भांडणे झाली. तिने शिवीगाळ केल्याचा राग येवून आपण तिचा दोरीने गळा आवळून खून केला व प्रेत गंगापूर शिवारात टाकून दिल्याचे आरोपी पठाण याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पठाण यास अटक केली आहे.

तो रॉकेल विक्रेता कोण?

या महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर वाळूंज पोलिसांनी नेवासा तालुक्यातील एका रॉकेल विक्रेत्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यामुळे तो रॉकेल विक्रेता कोण? अशी चर्चा होत आहे.