Mon, Sep 24, 2018 20:49होमपेज › Ahamadnagar › मुंबईच्या व्‍यापार्‍याचा चालकाकडून अहमदनगरमध्ये खून

मुंबईच्या व्‍यापार्‍याचा चालकाकडून अहमदनगरमध्ये खून

Published On: May 28 2018 10:41AM | Last Updated: May 28 2018 10:41AMअहमदनगर : प्रतिनिधी

 मुंबई येथील व्यापार्‍याचा त्यांच्या कार चालकाकडून खून केल्‍याची घटना घडली आहे. मालकाचा मृतदेह कर्जत तालुक्यातील भीमा नदीपात्रात फेकून देण्यात आला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी घटनास्‍थळी पोलिस दाखल झाले आहेत. 

या प्रकरणाचा तपास सुरू असून खून का करण्यात आला याची माहिती पोलिस घेत आहेत. यामध्ये ठार झालेल्या व्‍यक्‍तीचे नाव हसन उमर शेख (वय ५०) असे नाव आहे. शेख हे मालाड, मालवणी मुंबई येथील असल्याचे प्राथमिक तपासात निष्पण्ण झाले आहे.