Mon, Jun 17, 2019 10:12होमपेज › Ahamadnagar › आ.राजळेंकडून माणुसकीचे दर्शन!

आ.राजळेंकडून माणुसकीचे दर्शन!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शेवगावः प्रतिनिधी

रस्त्यावर जखमीअवस्थेत पडलेले कुटुंब.. वाहनांची वर्दळ.. मदतीसाठी याचना करूनही कोणीही थांबत नसल्याने जखमींच्या  वेदनाकडे पादचार्‍यांसह वाहनचालकांकडून होणारे दुर्लक्ष. अशा वेळी देवदूतासारख्या आ. मोनिका राजळे धावून आल्या. रस्त्यावरील अपघातग्रस्त जखमींना आधार देऊन त्यांना थेट स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केले. इतकेच नाहीतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार होईपर्यंत त्या तेथे थांबून राहिल्या. आ. राजळे यांनी दाखविलेल्या माणुसकीने जखमी कुटुंब गहिवरून गेले. 

आ. मोनिका राजळे या गुरुवारी पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील हरिनाम सप्ताहाचा सार्वजनिक कार्यक्रम आटोपून शेवगाव येथे उद्घाटन कार्यक्रमाला जात असताना दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान दैत्यनांदूर फाट्याजवळ घोटण येथील संतोष जगधने, धनश्री जगधने, जयश्री जगधने व एक लहान मुलगा दुचाकीवरून जात असताना त्यांचा अपघात झाला. हे कुटुंब गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविणे आवश्यक असताना कोणतेही वाहन मदतीची साथ देत नव्हते मात्र, आ. मोनिका राजळे यांनी प्रसंगावधान लक्षात घेऊन उपस्थितांच्या मदतीने या जखमी कुटुंबाला आपल्या वाहनातून नित्यसेवा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टर व इतर कर्मचार्‍यांना सूचना देऊन जखमींवर तात्काळ उपचार केले. तसेच त्यांच्या नातेवाईकांना बोलावून त्यांना धीर दिला.

अनेक वेळेस झालेला अपघात पाहूनही सत्तेचा अभिमान असणारे काही राजकीय महाभाग मदत करणे बाजूला राहिले परंतु आपल्या वाहनाच्या काचाही खाली घेत नाहीत. हल्लाबोल आंदोलनावेळी भातकुडगाव फाट्यावर याची काहींना प्रचिती आली. मात्र, आ. राजळे यांनी सत्तेचा अभिमान बाजूला ठेऊन सामाजिक कार्याच्या उदात्त हेतूने अनोळखी जखमींना मदतीचा हात दिला. परिणामी आ.राजळे यांच्या रुपाने धावून आलेल्या देवदूतामुळे आपले प्राण वाचले अशी ऋतज्ञता व्यक्त करून रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी त्यांना धन्यवाद दिले.

 

Tags : Shevgaon, Shevgaon news,  monika rajale, injured, hospital, admitted,


  •