Tue, May 21, 2019 00:19होमपेज › Ahamadnagar › जमिनीच्या मोजणीवरून हाणामारी

जमिनीच्या मोजणीवरून हाणामारी

Published On: Mar 06 2018 1:52AM | Last Updated: Mar 05 2018 11:30PMबेलापूर बदगी : वार्ताहर

अकोले तालुक्यातील गोपाळवाडी (बेलापूर) येथे दोन कुटुंबांत जमिनीच्या मोजणीवरून झालेल्या हाणामारीत दोन महिला गंभीर जखमी झाल्या. त्या संगमनेर येथे उपचार घेत आहेत. अकोले पोलिसांनी दोन्हीकडील चौदाजणांवर गुन्हा दाखल केलो. याबाबत निवृत्ती तुकाराम गोपाळे व दगडू सखाराम गोपाळे यांनी परस्परांविरोधात अकोले पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. निवृत्ती गोपाळे व दगडू गोपाळे यांच्यात जमीन वाटपावरून गेल्या चार-पाच वर्षांपासून वाद आहेत. दि. 29 सप्टेंबर 2017 रोजी जमिनीची मोजणी करून पंचासमक्ष दोघांनाही मान्य होईल, असा तोडगा काढला. मोजणी खासगी असल्याने 31 मे 2017 ला सरकारी मोजणी दगडू गोपाळे यांनी भरली. या मोजणीनंतर हद्द कायम झाल्याने निवृत्ती गोपाळे यांनी जमिनीचे सपाटीकरण केले.

तसेच 5 लाख रुपये खर्चून शेततळे बांधले. मात्र, गेल्या 28 फेब्रुवारीला दगडू गोपाळे यांनी पुन्हा सरकारी मोजणी आणली. त्यात निवृत्ती गोपाळे यांच्या शेततळ्याकडे काही हिस्सा दाखविला. भूकरमापक हद्दीच्या खुणा दाखवून गेल्यानंतर लगेचच दोन कुटुंबांत जबर हाणामारी झाली. यात सीताबाई तुकाराम गोपाळे या गंभीर जखमी, तर इतरानांही जबर मारहाण झाली. परस्पर फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी दगडू गोपाळे, बाळूबाई गोपाळे, विलास गोपाळे, माधव गोपाळे, अरुण गोपाळे, दीप्ती विलास गोपाळे, निवृत्ती गोपाळे, विठ्ठल गोपाळे, धोंडीभाऊ गोपाळे, सीताबाई गोपाळे, महादू धोंडीभाऊ गोपाळे, चंदाबाई सोपान इंदोरे यांच्यावर गुन्हा नोंदविला.