होमपेज › Ahamadnagar › घोणसे चा अभंग राज्यात प्रथम

घोणसे चा अभंग राज्यात प्रथम

Published On: Jan 23 2018 1:18AM | Last Updated: Jan 22 2018 11:18PMनगर : प्रतिनिधी

शहरातील घोणसे मॅथ्स् अ‍ॅकॅडमीचा विद्यार्थी आदित्य अभंग हा पुणे येथील झील एज्युकेशन सोसायटीतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम आला आहे. या यशाबद्दल त्याचा घोणसे अ‍ॅकॅडमीचे संचालक प्रा. सच्चिदानंद घोणसे व प्रा. नारायण सिनगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

झील एज्युकेशन सोसायटीच्या वतीने राज्यातील 23 जिल्ह्यात मॅथ्स्ची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील सुमारे 30 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. या परीक्षेत आदित्यने 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम आला. आदित्य हा 51 हजार रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. यापूर्वी घोणसे अ‍ॅकॅडमीचा विद्यार्थी स्वप्नील बोरुडे यांनी 2015 मध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला होता. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.