Thu, Jan 24, 2019 19:20होमपेज › Ahamadnagar › सासरच्यांनी विवाहितेच्या अंगावर ओतले अ‍ॅसिड

सासरच्यांनी विवाहितेच्या अंगावर ओतले अ‍ॅसिड

Published On: Apr 07 2018 1:41AM | Last Updated: Apr 07 2018 12:41AMनगर : प्रतिनिधी

नणंदेच्या लग्नासाठी माहेरून पैसे न आणल्याच्या रागातून विवाहितेच्या अंगावर अ‍ॅसिड ओतून गंभीर दुखापत करण्यात आली. भूतकरवाडी परिसरात बुधवारी (दि. 4) सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली.

याप्रकरणी पती अमोल अर्जुन आठरे, सासू पुष्पा अर्जुन आठरे, नणंद प्रतिका अर्जुन आठरे (सर्व रा. भूतकरवाडी, नगर) यांच्याविरुद्ध गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ‍ॅसिड हल्ल्यात प्रियंका अमोल आठरे (वय 27) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, प्रियंका यांना पती अमोल व सासरच्या इतर नातेवाईकांनी नणंदेच्या लग्नसोहळ्यासाठी पैसे मागितले होते. पैसे देण्यास प्रियंका यांनी विरोध केल्याच्या रागातून त्यांच्यात बुधवारी सायंकाळी कडाक्याचे भांडण झाले. यावेळी पती व सासूने प्रियंका हिला पकडून धरले, तर नणंद प्रतिका हिने अंगावर अ‍ॅसिड ओतले. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. 

याप्रकरणी जखमी प्रियंका आठरे यांनी दवाखान्यात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलिस ठाण्यात गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

Tags : Ahmednagar, Ahmednagar news, crime, married woman, acid attack,