Thu, Jul 18, 2019 08:03होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : महाराष्ट्र बंदला संगमनेरमध्ये हिंसक वळण

अहमदनगर : महाराष्ट्र बंदला संगमनेरमध्ये हिंसक वळण

Published On: Jul 24 2018 2:49PM | Last Updated: Jul 24 2018 2:46PMसंगमनेर :प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादमधील काकासाहेब शिंदे यांच्या जलसमधीनंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदच्या काळात अहमदनगर मधील कोल्हार घोटी राज्यमहामार्गावरील वडगाव पान शिवारातील बंद असणाऱ्या टोलनाक्यावर अज्ञातांनी एस. टी. बस जाळली. सहा ते सात अज्ञात इसमानी राज्य परिवहन महामंडळाची एस. टी. बस जाळल्याने मराठा मोर्चाला संगमनेरात गालबोट लागले.  

आज  संपूर्ण  महाराष्ट्र बंदची हाक  सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली होती.  संगमनेर तालुक्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले. तालुक्यातील वडगाव पान शिवारात मध्यरात्रीच्या  बारा वाजेच्या सुमारास  नाशिकहुन पंढरपूरला जाणारी बस जाळण्यात आली. याबाबत अज्ञात ६ ते ७ जणांविरुद्ध संगमनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.